Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील कन्टेन्टमेन्ट क्षेत्र वगळून उद्योगांना सुरू करण्याची परवानगी द्या -गजानन बाबर

एमपीसी न्यूज – कन्टेन्टमेन्ट क्षेत्र वगळून पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील उद्योगांना सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गजानन बाबर म्हणतात, कोरोना रूग्णांच्या अधिक संख्येमुळे पिंपरी-चिंचवड शहर रेड झोन हद्दीमध्ये येत आहे. अशा परिस्थितीत शहरातील सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु यामुळे उद्योजकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे.

उद्योग बंद असल्याने कामगार स्थलांतर करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरा हद्दी बाहेरील उद्योगांना परवानगी दिल्यामुळे उद्योजकांच्या हातातल्या ऑर्डर्स पण जाण्याची त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे.

कामगारांनी स्थलांतर केल्यामुळे उद्योग चालू झाल्यानंतर कामगार मिळणे खूप कठीण होईल, तसेच ऑर्डर्स गेल्यामुळे व्यवसायाला उभारी यायलाही खूप मोठी अडचण निर्माण होईल, सध्या उद्योजकांपुढे कामगारांचे पगार करण्याचे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील हद्दीमध्ये कन्टेन्टमेंट झोन सोडून उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.