Pimpri : २३ जुलै नंतर दुकाने अधिक काळासाठी उघडी ठेवण्याची मुभा द्या – प्रदीप नाईक

Allow shops to remain open for longer after July 23 - Pradip Naik : 23 तारखेनंतर पुन्हा लॅाकडाऊन करू नये

एमपीसी न्यूज – पिंपरी चिचवड आणि पुण्यातील 10 दिवसांच्या लॅाकडाऊनची मुदत येत्या 23 तारखेला संपत आहे. मात्र, 23 तारखेनंतर पुन्हा लॅाकडाऊन करू नये. उलट दुकाने अधिक काळासाठी उघडी ठेवण्याची मुभा देण्यात यावीअशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यानी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वरे त्यांनी हि मागणी केली आहे. पिंपरी चिचवड आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांच्या वाढती संख्या लक्षात घेता 10 दिवसांचा कडक लॅाकडाऊन लागू करण्यात आला आहे.

त्याची मुदत येत्या 23 तारखेला संपत असून प्रसाशनाने त्यानंतर पुन्हा लॅाकडाऊन करू नये, अशी नाईक यांनी मागणी केली आहे. यासह प्रदीप नाईक यांनी विविध मागण्या केल्या आहेत.

काय आहेत इतर मागण्या?

  • दुकाने अधिक काळासाठी उघडी ठेवण्याची मुभा देण्यात यावी.
  • शासनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळेल अशा योजना राबवल्या जाव्यात.
  • पॅरोलवरील गुन्हेगारांना पुन्हा कारागृहात पाठवावे.
  • छोट्या उद्योग व्यवसायांना चालना मिळण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात यावे .
  • विद्यालय व महाविद्यालयांची तीन महिन्याची फी माफ करावी.
  • प्रायव्हेट ट्युशन धारकांनी सुद्धा फी साठी तगादा लावू नये; अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
  • लॅाकडाऊन मध्ये नियम मोडल्याचे खटले व गुन्हे (गंभीर गुन्हे वगळता) मागे घ्यावेत.
  • दुकानदारांचे तीन महिन्याचे भाडे शासनाने द्यावे.
  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत करावी.
  • कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांना पोलीस खात्यात नोकरी देण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.