Pimpri: खेळाचा सराव करण्यास परवानगी द्या; उपमहापौर तुषार हिंगे यांची मागणी

Pimpri: Allow to practice the game; Demand of Deputy Mayor Tushar Hinge लॉकडाऊनमुळे तब्बल पावणेतीन महिने झाले. शहरातील सर्वच खेळाडूंचा क्रीडा सराव बंद आहे. त्यामुळे त्यांना नैराश्य येण्याची शक्यता आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यातील 25 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील खेळांची सर्व मैदाने, क्रीडांगणे बंद ठेवण्यात आली आहेत. खेळाडूंचा सराव बंद आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. खेळाचा सराव करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले आहे. उपमहापौर हिंगे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे तब्बल पावणेतीन महिने झाले. शहरातील सर्वच खेळाडूंचा क्रीडा सराव बंद आहे. त्यामुळे त्यांना नैराश्य येण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांची शारीरिक क्षमता, कौशल्य कमी होण्याची भिंती आहे.

फिजिकल डिस्टन्सिंग ठेऊन सराव करण्यास परवानगी दिल्यास त्यांची शारीरिक तंदुरूस्ती वाढून प्रतिकार शक्ती वाढणार आहे. त्यामुळे ते आजारापासून दूर राहतील. तसेच, त्याचा शारीरिक क्षमता कायम राहण्यास मदत होईल, असे उपमहापौर हिंगे यांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.