Pimpri: औद्योगिकनगरीतील उद्योग सुरु करण्यास परवानगी द्या -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील लघु उद्योजकांना व्यावसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र (कंन्टेन्मेंट झोन) वगळून विकासकामे, पावसाळ्यापूर्वीची कामे करावीत, असेही बारणे यांनी सांगितले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशात लॉकडाउन आहे. त्याला 52 दिवस पुर्ण होत आले आहेत. लॉकडाउन काळात जनजीवन ठप्प झाले आहे. .

राज्य सरकार, डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, पोलीस अधिकारी, कर्मचारी सर्वेतोपरी प्रयत्नांची परिकाष्टा करत आहे. तरी, कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही.

कोरोना सोबत जगण्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. औद्योगिकनगरीतील अर्थचक्र सुरु होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील छोटे व्यावसायिक तसेच उद्योग व इतर व्यावसाय चालू करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, सुरक्षिततेची काळजी घेत व्यावसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी.

कंन्टेन्मेंट झोन वगळता महापालिकेची विकास कामे चालू करावीत. पावसाळ्या पूर्वीची कामे, रस्ते, नाल्यांची साफसफाई व दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. पाणीपुरवठा व आरोग्य विषयक कामांना मंजुरी देऊन तात्काळ सुरू करावीत, अशा सूचना खासदार बारणे यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.