BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri – सिंधू सेवा संगम ट्रस्टतर्फे अमित गोरखे यांचा सन्मान

0 117
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – सिंधी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा)निवड झाल्यानिमित्त सिंधू सेवा संगम ट्रस्टतर्फे अमित गोरखे यांचा सन्मान करण्यात आला.

सिंधू सेवा संगम ट्रस्टतर्फे सिंधी नववर्ष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित केलेल्या चेटीचंड उत्सवात सिंधी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला जळगावचे माजी आमदार, सिंधी समाज अॅकडमीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) गुरुमुख जगवाणी, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, कमल मलकाणी, जयदेव देब्रा आदी उपस्थित होते.

  • अमित गोरखे यांनी सिंधी समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. रोजगार निर्माण करुन दिले आहेत. तरुणांना प्रोत्साहित केले आहे. त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान केल्याचे, जयदेव देब्रा यांनी सांगितले. सिंधी समाजासाठी यापुढे देखील सर्वेतोपरी सहकारी करण्याचे आश्वासन सत्काराला उत्तर देताना अमित गोरखे यांनी दिले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.