Pimpri : युतीत बंडाळी, भाजपचे अमित गोरखे यांनी भरला अपक्ष अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरुवारी) अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे युतीमध्ये बंडाळी झाली आहे.

शिवसेना-भाजप-आरपीआयची महायुती झाली. महायुतीत पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने भाजपचे अमित गोरखे यांनी बडखोरी केली आहे.

गोरखे यांनी आज रॅली काढत आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. गोरखे यांच्यासोबत भाजप नगरसेवक तुषार हिंगे, शीतल शिंदे, नगरसेविका सुजाता पालांडे, काँग्रेसचे मनोज कांबळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.