Pimpri : 100 ते 1 आकडे उलट्या क्रमाने बोलणाऱ्या अमितची ‘आसाम बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

एमपीसी न्यूज – १०० ते १ आकडे उलट्या क्रमाने ३८ सेकंदात बोलून दाखवणाऱ्या अमित देशमुख या पिंपरीमधील तरूणांची ‘आसाम बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरीमधील अमित देशमुख या तरुणाचे नाव एका अनोख्या विक्रमासाठी चर्चेत आहे. १०० ते १ आकडे उलट्या क्रमाने बोलून दाखवण्याची किमया अमितने अवघ्या ३८ सेकंदात करुन दाखवली आहे. पिंपरीमध्ये २८ जानेवारी रोजी अमित देशमुख यांच्या घरी ‘आसाम बुक ऑफ रेकॉर्ड’ यांच्या समक्ष त्याने हा विक्रम करून दाखवला.

‘आसाम बुक ऑफ रेकॉर्ड’ यांनी त्यांच्या कामगीरी आणि विशेष कौशल्याचे कौतुक केले. तसेच त्याला या कामगिरीबद्दल नॅशनल रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1