Pimpri: ‘इ’ प्रभागातील मजूर पुरविण्यासाठी दोन कोटींचा वाढीव खर्च

An additional cost of Rs. 2 crore for providing labor in the E ward

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ प्रभागातील पाणीपुरवठा करणा-या मजूर नियुक्तीला वाढीव खर्च येणार आहे. त्यासाठी येणा-या दोन कोटींच्या वाढीव खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सर्व सभा ऑनलाइन घ्याव्यात, अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्यानुसार स्थायी समितीची सभा देखील ऑनलाईन होत आहे.

पालिकेच्या ‘इ’ प्रभागातील पाणीपुरवठा करण्यासाठी टाक्या आहेत. त्यावर मजूर पुरविण्याचे काम राजेश इंजिनिअरिंगला देण्यात आले आहे.

या कामाची मुदत 12 महिने आहे. तर मोशी, डुडुळगाव, च-होली, वडमुखवाडी, मॅगझीन, दिघी, बोपखेल, भोसरी भागातील टाक्या आणि संचालनासाठी मजूर आवश्यक असतात.

या कामासाठी एक कोटी दोन लाखांच्या खर्चास 18 सप्टेम्बर 2019 च्या सभेत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने या कामाचा 3 कोटी 29 लाख या सुधारित खर्चासाठी तरतूद करण्यासाठी दुस-या लेखाशीर्षावरून वाढ आणि घट करणे.

शिवाय निविदेची मूळ रक्कम वजा करून वाढीव सुधारित खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.