Pimpri News : सोशल मीडियावर अश्लील मेसेज करत महिलांच्या विनयभंग प्रकरणी पिंपरी आणि दिघीत गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरीत एका महिलेचे फोटो आणि अश्लील मेसेज सोशल मीडियावर टाकून तिचा विनयभंग केल्याचा एक प्रकार उकडकिस आला आहे. तर दिघी परिसरात एकाने अशाच पद्धतीने फोटो अपलोड करत विनयभंग केला. तसेच त्याच्यासोबत बोलण्याची देखील आरोपीने मागणी केली. याबाबत पिंपरी आणि दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरी येथील घटनेत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून प्रशांत शामराव अंजनीकर (वय 48, रा. धायरी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रशांत याने सोशल मीडियावर पीडित महिलेचे दोन फोटो त्यावर अश्लील मेसेज लिहून अपलोड केले. अश्लील स्क्रीन शॉट काढून ते महिलेच्या फोनवर पाठवून तिचा विनयभंग केला.

दिघी येथील घटनेत 24 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपम दिलीप मिलमिले (रा. नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मिलमिले याने फिर्यादी महिलेच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून त्यावर महिलेचे अश्लील फोटो एडिट करून पोस्ट केले. त्यावर महिलेबद्धल चुकीची माहिती पोस्ट करून ते महिलेच्या नातेवाईकांना टॅग केली. पीडित महिला आरोपी मिलमिले सोबत बोलली नाही तर तो आत्महत्या करेन अशी धमकी देखील त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

वरील दोन्ही प्रकरणांमध्ये विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियाद्वारे महिलांची बदनामी करणे, त्यांचा विनयभंग करण्याचे प्रकार वाढत आहेत. महिलांचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देऊन अथवा पोस्ट करून त्याद्वारे त्यांच्याकडे शरीरसुखाची, पैशांची तसेच प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.