BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: …अन्‌ पार्थ पवार यांनी ‘हरे कृष्णा, हरे रामा’च्या तालावर धरला ठेका (व्हिडीओ)

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी ‘हरे कृष्णा, हरे रामा’च्या तालावर ठेका धरला…. निमित्त होते इस्कॉनच्या वतीने आयोजित केलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेचे…..

सध्या शहरात लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनोख्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. त्याच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोयं.

इस्कॉनच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या श्रीजगन्नाथ रथयात्रेत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी सहभाग घेतला. पार्थ यांनी केवळ सहभागच घेतला नाही. तर, त्यांनी चक्क ‘हरे कृष्णा, हरे रामा’च्या तालावर ठेका धरला. त्यांचा हा नवीन अंदाज पाहण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शहरवासियांनी गर्दी केली होती.

.

HB_POST_END_FTR-A1
.