Pimpri : शहरासह परिसरात विविध उपक्रमांनी ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा

विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांसह कराटे, विविध गुणदर्शन आदींचे सादरीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात ७० वा प्रजासत्ताकदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होत.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहूल जाधव, आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, कमल घोलप, अपर्णा डोके आदी उपस्थित होते. पालिकेच्या मुख्य कार्यालयात आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले,

स्वतंत्र भारताच्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रहाटणी -पिंपळे सौदागर परिसरातील विविध शाळेमध्ये ध्वजारोहण तसेच खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला .शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला.

  • पिंपळे सौदागर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण
    पिंपळे सौदागर येथील महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय, हॉली इंग्लिश मिडियम स्कूल, श्लोका बिर्ला प्रायमरी स्कूल, रहाटणी पिंपळे सौदागर व्यापारी असोसिएशन, द क्रेस्ट सोसायटी, वसंत अव्हेन्यू सोसायटी, रोझव्हॅली सोसायटी, रोझलँड रेसिडेन्सी गेट १,२,३, तसेच परिसरातील विविध सहकारी गृहनिर्माण सोसायट्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि नगरसेविका शितल नाना काटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

  • पिंपळे सौदागर येथील पीके इंटरनॅशनल स्कूलमध्ये कवायती
    पिंपळे सौदागर येथील वै. ह.भ.प संचलित पीके इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कॅप्टन विजय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली.  विद्यार्थ्यांनी झेंडा गीत तसेच देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर केले.

याप्रसंगी पीके स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पवना सहकारी बँकेचे अध्यक्ष जयनाथ काटे, उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा -कुंदा भिसे, नारायण काटे, मनोहर काटे, निलेश कुंजीर, किरण जगताप, सचिव सोमनाथ काटे, मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, पर्यवेक्षिका सविता आंबेकर, क्रीडाशिक्षक राहुल कोरे शिंदे सयनाजी, कार्तिकला गायकवाड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक तसेच सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांपैकी कशिश दाद्वानी आणि कलश सैतवाल यांनी केले . तर आभार आयुष सरजिने आणि जयेश शेलुडकर यांनी मानले.

  • चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना खाऊवाटप
    पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धजारोहण करून राष्ट्रगीत झाले. विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून उपस्थितांची मने जिकंली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल पाटील, मिलींन खडके उपस्थित होते. यावेळी पालक अतिथि उपस्थित सुरेश जाधव, रेश्मा मूलमाने , सौ. वैशाली पाटील, मोनाली खडके उपस्थित होते.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी बहारदार नृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. याप्रसंगी शाळेचे संस्थापक संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, शाळेच्या समन्यवयक रजनी घुगे, पूर्व प्राथमिक विभाग समन्यवयक पलक गांधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे खाऊवाटप करण्यात आले.

  • रहाटणीत संस्कृतीक कार्यक्रम उत्साहात
    रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित, न्यू सिटि प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्वराज नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते आर. डी. भालेराव, अनिता तुतारे, भगवान गोडांबे, माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, आबा पांढरे, संतोष कापसे, इंद्रजीत काटे, राजेश गायकवाड, तात्या शिनगारे, स्वप्नील भालेराव, शर्वरी जमालकर, बाळासाहेब शेडगे, युवराज प्रगणे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संदीप चाबूकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिश यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यानी देशभक्ती गीत, संस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवली. विद्यार्थ्यानी कराटे प्रात्यक्षिक सादर केले.

“भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे ११ महिने १७ दिवसात परिश्रम घेऊन स्वत: आजारी असतांना एकट्याने संविधान लिहिले. त्यामुळेच जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वश्रेष्ठ संविधान आपल्या देशात आहे व भारतीय संविधानामुळेच देश अखंड आणि अभेद्य आहे.” संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार यांनी असे उदगार काढले. या विविध कार्यक्रमानी सजलेल्या प्रजासताक दिनाचे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सांगता करण्यात आली. स्वरूपा पौड आणि साक्षी वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. आस्था महातो हिने आभार मानले.

एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. या प्रसंगी गुणवंत विद्याथिर्नी डॉ श्रुती शेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी डॉ. सुरेश घैसास, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता डॉ. धनाजी जाधव तसेच विद्याथिर्नी व कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा शर्मा यांनी केले.

  • खराळवाडी येथे शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) यांच्या हस्ते ध्वजारोहण
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी येथे ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारतदेशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या आणि विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याच्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी महापौर योगेश बहल, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका अपर्णा डोके, राजू मिसाळ, प्रवक्ते फजल शेख, अरुण बोऱ्हाडे, महंम्मद पानसरे, गोरक्ष लोखंडे, निलेश पांढारकर, सतीश दरेकर, विशाल काळभोर, आनंदा यादव, प्रदीप गायकवाड, ज्ञानेश्वर कांबळे, विश्रांती पाडाळे, कविता खराडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, वर्षा शेडगे, सुभाष गावडे, अरुणा कुंभार, शक्रुल्ला पठाण, शहजादी सय्यद, दत्तात्रय जगताप, जवाहर इटकल, प्रविण गव्हाणे, ‍मिनाक्षी उंबरकर, दिलीप तापकीर, माधव बिराजदार, सविता खराडे, मेघा पवार, शशिकांत निकाळजे, दिपाली देशमुख, संजय औसरमल, देवी थोरात, शामराव काळे, रमेश नखाते, अभिजीत आल्हाट, साहुल शेख, सचिन मोरे, रशिद सय्यद, राहुल आहेर निर्मला माने, रविंद्र लाडूकर, ज्ञानेश्वर मोरे, सलीम सय्यद, बाळासाहेब जगताप, मोहन विनोदे, परमेश्वर गोफणे, ‍विलास वाल्हेकर, अंगद राजणे, किरण देशमुख, प्रशांत कडलग, गोरोबा गुजर, बाळासाहेब सोनवणे, अनिकेत मोहिते आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  • सांगवीत विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण वाचवा’ दिला संदेश
    सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीलम जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे, प्रिया मेनन, कलाशिक्षिका दीपिका शिडीमकर यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत जुनी सांगवी परिसर घोषणांनी दणाणून सोडला. ‘पृथ्वी वाचवा’, ‘पर्यावरण वाचवा’, ‘मुलगी वाचवा’, ‘स्वच्छता राखा’, ‘जय जवान, जय किसान,’ ‘प्लास्टिकचा वापर टाळा’, अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर केलेले नृत्य लक्षवेधक ठरले. तसेच माणसातला अहंकार नष्ट होऊन एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यावर आधारीत नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहायक पोलीस आयुक्त नीलम जाधव म्हणाल्या, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून संरक्षण दल, पोलीस प्रशासनात यावे. आज या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या संधींचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. तसेच सामाजिक कार्यातही विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. अतूल शितोळे, प्रिया मेनन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  • सारा सिटीत शिवसेनेच्या महिला अध्यक्षा नंदाताई कड यांच्या हस्ते ध्वजारोहण
    सारा सिटी फेज डी सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये 70 वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा साजरा करण्यात आला. खेड तालुका शिवसेनेच्या महिला अध्यक्षा नंदाताई कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भरत बिरदवडे, भगवान चौधरी, बाळासाहेब कड, हरीश बारुखा, सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कड, खजिनदार बाबुराव कदम, सचिव मल्हारी घाडगे, संजय पालुतकर, दत्ता टाकळकर, योगेश टेकाळे, सुहास हट्टीकर, पोलीस पाटील किरण कीर्ते आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षारक्षकांच्या संचलनाने झाली. ध्वजवंदन आणि प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त सोसायटीतील महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी विविध देशभक्तीपर गीतांचे गायन, नृत्य बालचमूंनी सादर केले.कांतीलाल शाह विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.

  • तळेगाव दाभाडे येथे ध्वजारोहणनंतर विद्यार्थ्यांनी केले संचलन
    तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या कांतीलाल शाहू विद्यालयात 70 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवना हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. सत्यजीत वाढोकर आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे खजिनदार रामदास काकडे उपस्थित होते. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे, नम्रता शाह, शर्मिला शाह, प्राची शाह, यशवंत पाटील, मुख्याध्यापिका सुमन रावत, स्मिता पेंडुरकर यांच्यासह पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संचलन केले आणि विविध लोकनृत्यातून ‘विविधतेत एकता’ हा संदेश दिला. तसेच चार हाऊसेसनी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. रामदास काकडे यांच्या हस्ते खेळाच्या मैदानाचे उद्घाटन झाले. प्राची शाह यांनी रिडिंग क्लबची माहिती देत उद्घाटन केले.

यावेळी रामदास काकडे म्हणाले, की खेळ हा निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी अत्यावश्यक आहे. तसेच ‘वाचाल तर वाचाल’ म्हणजेच विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे.

त्यानंतर डॉ. सत्यजीत वाढोकर म्हणाले, की विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना स्वतःची आवड जपली पाहिजे. आजच्या दिनाचे महत्व सांगून शाळेच्या सस्कृतीचे कौतक केले. यावेळी मान्यवर, पालक, माजी विध्यार्थी आदी उपस्थित होते. शाळेच्या शिक्षिका संजाली गरुड आणि प्रिया पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन वैशाली शिंदे आणि सौजन्या बकरे यांनी, तर आभार प्रिया पटवर्धन यांनी मानले.

  • थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
    थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, यावेळी भारतमातेचे पूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रोफेसर इन बायोकेमिस्ट्री डी. वाय.पाटील कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर रंजना नवले, राष्ट्रीय संचालक डॉक्टर सुनील चोरे, लायन्स क्लब फिनिक्स चे शशांक फाळके, संजय सत्तुरवार, सुरेश पाटील, लायन्स क्लबचे नरेंद्र पेंडसे, सोमनाथ बो-हाडे, मकरंद शाळीग्राम थेरगावच्या नगरसेविका झामाबाई बारणे, तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे संचालक नितीन बारणे, गतिराम भोईर, निता मोहिते,आसाराम कसबे, संजय कुलकर्णी, शाळेचे माजी विद्यार्थी तसेच बहुसंख्य पालक व बालवाडी ते दहावीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

शाळेतील बालवाडी ते 10 वी चे विद्यार्थी श्रेया शिंदे, कल्याणी बनसोडे, रितेश कदम, रिया हावळे, ओम चोथे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये भारत मातेची वैशिष्ट्ये सांगितली तसेच भारतात होऊन गेलेले संत, नेते, सैनिक, शेतकरी, शास्त्रज्ञ यांची उदाहरणे देऊन दुसऱ्यांसाठी जगा, असा संदेशही दिला.

शशांक फाळके यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात चांगल्या नियमांचा अवलंब करा, असे सांगितले, वाहतुकीचे नियम पाळा असा संदेशही या वेळी दिला. सुनील चोरे यांनी भारताच्या झेंड्यातील रंगांचे विशेषण सांगून झकास काम करा. असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खिंवसरा पाटील विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी केले तर आभार लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर हांडे व अंजली सुमंत या शिक्षकांनी केले.

यानंतर बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाले इयत्ता आठवी- नागरिकांनी मतदान करणे किती गरजेचे आहे यावर जनजागृती करणारा पोवाडा. तसेच “स्वदेशी वस्तू आणूया घरा” या संदेशावर आधारित भारूड सादर केले. इयत्ता नववी – बेटी पढाओ, बेटी बचाओ हा संदेश देणारे गीत. प्रादेशिक विविधता दर्शवणारे गाणे. आजादी की जंग हे गाणे विविध कसरती करून सादर केले. अशाप्रकारे विविध विषयांवरील नृत्य सादर करण्यात आली.

प्रजाकसत्ताक दिन शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात व निलंगामधील राठोडा गाव शालेय साहित्य वाटप करून मोठ्या उत्सवाहत साजरा केला.

शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले आणि प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या मराठवाड्यामधील राठोडा जिल्हा परिषदमध्ये अनाथ मुलांना शालेय साहित्यांचे वाटप प्रसिद्धीप्रमुख दत्ता गिरी यांनी केले. यावेळी प्रेम सोमवंशी,पंकज जाधव, विनोद जाधव,आमोल जगताप,प्रदिप शेळके,किरण जाधव, विजय कवटकर,प्रशांत जाधव,सरपंच पंकज शेळके उपसरपंच महेश सोमवंशी, बाबासाहेब सोमवंशी आदी उपस्थित होते.

तसेच शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग आणि शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सार्वजनिक वाचनालय शिवसेना शाखा तापकिरनगर या ठिकाणी शिवसैनिक सितादेवी एटरप्रायजेसचे उद्योजक विनायक पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पेढे वाटप केले.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले,प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, प्रदिप दळवी, नवनाथ जाधव, निलेश भेलके, भिमराव ढवारे, शिवाजी तेलंगे, नितीन येडके, सचिन घोलप, भिमराव कुलकर्णी, रविकिरण घटकार, आशिष वाळके, भारत गोडांबे, सतिश भवाळ, आतुल गाडवे,मारूती मस्के,बाळासाहेब गायकवाड,आदी उपस्थित होते.

  • थेरगाव येथे अध्यक्ष तुकाराम गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण
    माझी प्रत्येक कृती ही पुढील पिढीला आदर्श वाटेल अशी घडावी असा प्रत्येकाने विचार करण्याचे आवाहन तुकाराम गुजर यांनी व्यक्त केले.
    ते थेरगाव येथील प्रेरणा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव व प्रेरणा बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर, व्हाईस चेअरमन संतोष मुंगसे, संस्थेचे खजिनदार शांताराम जांभूळकर,प्रशासन अधिकारी विलास दसाडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, प्राचार्य यशवंत पवार,मुख्याध्यापक सुनिल सोनवणे, पर्यवेक्षक धनसिंग साबळे, आकाश गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नाना शिवले यांनी मनोगत व्यक्त करताना चांगुलपणा हेच जीवनातील समाधानाचे आणि आनंदाचे मुख्य कारण आहे असे सांगत चांगुलपणा जपण्याचे आवाहन केले.

सूत्रसंचालन दत्ता उबाळे यांनी केले. प्रास्ताविक मोहन परहर यांनी केले लेझीम, पंचरंगी कवायत, समूहगीत, देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम, एरोबिक्स आदी कार्यक्रम सादर केले. क्रीडाशिक्षक रमेश कदम, अनिल नाईकरे, बिपीन देशमुख, मोहन परहर, ज्ञानेश्वर बोरसे,आशा पाटोळे, स्वाती तपासे, दिलीप माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

  • चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन साजरा
    शिक्षण ही भविष्याची शिदोरी आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे प्रतिपादन आवाहन प्रसिद्ध व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश धर्मावत यांनी केले. चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेचे प्रतिभा शैक्षणिक संकुलात 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याच्या हस्ते विद्यार्थी आणि पालकांना उद्देशून त्यावेळी उपस्थित विद्यार्थी व या समारंभात संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, मुख्याध्यापिका सविता ट्रव्हीस, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, वनिता कुर्‍हाडे, डॉ. ब्रिगेडिअर, डॉ. अजय लाल, डॉ. के.आर. पाटेकर यावेळी उपस्थित होते. विद्यार्थीनी यावेळी देशभक्तीपर गीत, नाटीका, नृत्य सादर केले.

यावेळी प्रमुख पाहुणे सुरेश धर्मावत पुढे म्हणाले, आपली ध्येय निश्चियी, शांततेसाठी आणि देश पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी शिक्षणाची गरज असून शिक्षण हीच भविष्याची शिदोरी आहे. त्याकडे दुर्लक्ष करु नका. शैक्षणिक यशासाठी ‘टाईमपास’ हा शब्द आपल्या शब्दकोषातून प्रत्येकाने काढून टाकला पाहिजे. तसे केले तरच यश तुमच्याकडे धावत येईल.

यावेळी महाविद्यालयातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या प्राध्यापक, विद्यार्थी, खेळाडू कलावंत यांचा धर्मावत यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. सचिव, डॉ. दीपक शहा म्हणाले, विद्यार्थीनी राष्ट्रासाठी उत्कृष्ठ शिक्षण घेवून उद्याचे आधारस्तंभ बनवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र वाघमारे यांनी तर आभार प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी केले.

  • पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देशभक्तीपर समुहगीतांचा कार्यक्रम
    पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मदनलाल धिंग्रा मैदान निगडी, प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीतांच्याकार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समितीचे सभापती संजय नेवाळे, शिक्षण समितीच्या सभापती प्रा.सोनाली गव्हाणे आदी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन यशस्वी आणि अप्रतिम झाले आहे. या पुढील काळात अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या राष्ट्रीय कार्यक्रमातून देशाबददलचा अभिमान लहानपणीच विदयार्थ्यामध्ये रुजला पाहिजे, आपल्या शहरातील मुले गुणवत्तेत कोठेही कमी पडायला नकोत. त्यांच्यात राष्ट्रप्रेमाच्या भावना सतत जागृत राहिल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर हे भविष्यात आर्दश शहर होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शहराची सुंदरता स्वच्छतेत आहे.सर्व शहर हिरवेगार दिसले पाहिजे विविध प्रकारच्या वृक्षवल्लीची लागवड झाली पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र प्राप्तीसाठी अनेक शूरविरांनी आपले प्राण गमाविले आहे. त्यांचे स्मरण ठेवून आपण आपल्या कार्याची दिशा ठरविली पाहिजे. त्यांनी दिलेल्या योगदाना बददल अस्मिता ठेवून आपला देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशिल असले पाहिजे असे ते म्हणाले.

त्यानंतर पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून एवढा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम पार पडतो. याचे सर्व श्रेय आयेजकाला आणि त्यांच्या टीममध्ये काम करणा-या प्रत्येक व्यक्तीला जाते. मुख्यध्यापक आणि शिक्षक मुलांना चांगलं घडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. आणखी प्रयत्न केल्यास पिंपरी चिंचवड शहराचा विध्यार्थी हा येणा-या काळात देशातील मोठ-मोठया पदावर आरुढ होवून आपल्या शहराचा नावलौकिक करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार महेश लांडगे, क्रीडा कला साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती संजय नेवाळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात शहरातील सुमारे पाच हजार विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी देशभक्तीपर समूह गीते सादर केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पिंपरी चिंचवड कला आकादमीच्या सर्व कलाकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त आशा राऊत यांनी केले. आभार नगरसदस्या सुजाता पालांडे यांनी मानले.

  • निगडी येथील भक्ती शक्ती चौकात सादर केली देशभक्तीपर गीत सादर

निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे प्रजासत्ताक दिवसानिमित्त देशभक्तीपर गीतांचा भव्य कार्यक्रम महानगरपालिकेतर्फे आयोजीत करण्यात आला होता. ख्यातनाम संगितकार चिंतन मोढा यांनी त्यांच्या योगेश सुपेकर, सायली कुलकर्णी, विवेक पांडे, पृथ्वीराज इंगळे,आदी सहका-यांसह देशभक्तीची गीते सादर केली. संदिप उबाळे या छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील पाश्वगायकाने गायन सादर करून नागरीकांची मने जिंकली. या कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्य विलास मडिगेरी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, मनोज सेठीया आदी मान्यवर उपस्थित होते.

  • राष्ट्रीय सणांमुळे देशाची अखंडता वृद्धिंगत – हाजी इक्बाल खान
    आपले राष्ट्रीय सण प्रत्येक भारतीयाने संघटित होऊन साजरे केल्यास देशाची एकता आणि अखंडता निश्चितच वृद्धिंगत होईल, असे मत बीना इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष हाजी इक्बालखान यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.

सत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त बीना इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात ध्वजारोहण करताना इक्बाल खान बोलत होते. यावेळी मौलाना खालीद, मौलाना अब्दुल गफ्फार, मौलाना मसिहुद्दिन अब्बासी, राज अहेरराव, सुरेश कंक, प्रा.तुकाराम पाटील, शौकत खान, हमजाखान, आझम खान आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडून बनवलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी, ‘बेटी बचाओ’ – बेटी बढाओ’, आधुनिक युगातील संगणकाचे महत्त्व, यंत्रमानव, पुण्यातील मेट्रो, जलसंधारण आणि प्रदूषण अशा विविध संवेदनशील विषयांवरील प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या शास्त्रीय कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या विज्ञान प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट दिली. बीना इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या समिना मोमीन, अध्यापक आणि कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

अंध अपंग असोसिएशन या संस्थेत २६ जानेवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत सहाणे यांच्या हस्ते धजारोहण करण्यात आले. यावेळी प्रदीप गायकवाड, अलोक गायकवाड, यशवंत कण्हरे, विजय गिरणे, विष्णु कांबळे आदी उपस्थित होते. प्रदीप गायकवाड यांनी आभार मानले.

  • तळेगाव येथे शहीद सौरभ फराटे यांच्या माता-पित्याच्या हस्ते ध्वजारोहण
    नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या तळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद सौरभ फराटे यांच्या मातोश्री मंगल फराटे आणि पिता नंदकुमार फराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, विश्वस्त राजेश म्हस्के, सुरेशभाई शहा, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा आदींसह विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पुत्र गमावलेल्या वीरमाता मंगल फराटे यांनी अत्यंत भावनापूर्ण मनोगत व्यक्त केले. ‘देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सौरभचा मला सार्थ अभिमान आहे. एक मुलगा देशासाठी शहिद झाला असला तरी दुसरा देखील सैन्यातच कार्यरत आहे. कृतार्थ भावनेने कार्य करीत देशासाठी त्याग आणि वेळप्रसंगी बलिदानाची तयारी ठेऊन तरुणांनी सैन्यात यावे,असे आवाहन मंगल फराटे यांनी केले.

यावेळी संतोष खांडगे, प्रा. विजय नवले यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पथसंचलनाचे नेतृत्व ओंकार तनपुरे याने केले तर शुभम वाळुंज याने सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. भारताच्या विविध राज्यांमधील देशभक्तांचे कार्य दर्शविणाऱ्या रांगोळी आणि भित्तीचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सागर जोशी यांनी केले. या कार्यक्रमास नूतन अभियांत्रिकी, एनसीईआर, पॉलिटेक्निकचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

  • दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण इन्स्टिट्युशनचे अध्यक्ष प्रा. के. के. घोष यांचे हस्ते झाले. यावेळी त्यांनी “इन्स्टिट्युशन अखंडपणे आपले राष्ट्रीय सण साजरे करते. इन्स्टिट्युशनने गुणवत्तापूर्ण उच्च तंत्रशिक्षण देऊन गौरवशाली परंपरा कायम राखली, हे अभिमानास्पद असून ही एक राष्ट्रसेवा असल्याचे प्रतिपादन केले.

चार्टर्ड इंजिनिअर विष्णु बनकर यांनी “पुणे टेक्निशियन चाप्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आणि अभियंत्यांच्या आरोग्यासाठी तसेच कौशल्यांना व सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडादिन, अंताक्षरी, आनंदमेळावा आदी स्तुत्य उपक्रम राबविले असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे” असे आवाहन करून उपस्थितांचे आभार मानले.

इन्स्टिट्युशनचे सदस्य विपीन मुनोत यांनी “प्रथम राष्ट्र, द्वितीय सेवा आणि तृतीय स्वतः” असा देशप्रेमी कानमंत्र दिला. इन्स्टिट्युशनचे . सचिव अविनाश निघोजकर, सदस्य हर्षवर्धन देवकाते, ग्रंथपाल चंद्रशेखर वाघमारे, कर्मचारी यादव, फरीद शेख आदींनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी, कर्मचारी तसेच इन्स्टिट्युशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.