Pimpri : …. अन्‌ पोलिसांनी सोडला सुटकेचा श्वास !

नोव्हेंबर महिन्यात शहरात दोन अपहरणाच्या घटना

एमपीसी न्यूज – घरासमोरील अंगणात खेळत असताना पिंपरीतून ३ आणि ५ वर्षाचे दोन भाऊ खेळता-खेळता हरवले. मुलांचे अपहरण तर झाले नाही ना, या शक्यतेमुळे पिंपरी पोलिसांनी तपास यंत्रणेला कामाला लावत मुलांचा शोध सुरू केला.अखेर पाच तास शोध घेतल्यानंतर एकजण काळेवाडी आणि एकजण पिंपरीगाव येथे सापडला. आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. हा प्रकार आज (शनिवारी) दुपारी घडला.

निखील रविकेवट निसाद (वय-5) आणि अंकित रविकेवट निसाद ( वय-3 ) (रा. इंदिरागांधीनगर शाळेसमोर, बलदेवनगर, पिंपरी) अशी मुलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील आणि अंकित शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घरासमोर खेळत होते. दोघेही खेळत-खेळत एक जण काळेवाडीला गेला. तर दुसरा पिंपरीगावात गेला. पालकांनी मुलांचा परिसरात शोध घेतला असता मुले आढळून आली नाही. त्यामुळे पिंपरी पोलिसांना याची माहिती दिली.

नोव्हेंबर महिन्यात शहरात दोन अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे या मुलांचे अपहरण तर झाले नाही ना? या शक्यतेमुळे मुलांच्या शोधासाठी तपास यंणत्रा कामाला लावली. अखेर पाच तासाच्या शोध मोहिमेनंतर एकजण काळेवाडी व एकजण पिंपरीगाव येथे सापडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.