Pimpri : आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लवकरच “दिशा” कायदा करणार -सतेज पाटील

एमपीसी न्यूज – महिला अत्याचारातील दोषीना शिक्षा होण्यासाठी आंध्राप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार लवकरच “दिशा” कायदा करणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका सत्कार कार्यक्रमा दरम्यान दिली.

हिंगणघाट येथील प्राध्यापीका व औरंगाबाद मधील महिलेला जिवंत जाळून ठार केलेल्या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या तर आहेतच पण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालवणाऱ्या देखील आहेत. महिला अत्याचारातील दोषीना शिक्षा होण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकार लवकरच “दिशा” कायदा करणार आहे.

या कायद्यात घटना घडल्यापासून सात दिवसात तपास, एकवीस दिवसांत कनव्हेकशन होऊन पंचवीस दिवसात आरोपीस शिक्षा होणारच, अशी कायद्यात तरतूद असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आकुर्डी येथील आयोजित एका सत्कार कार्यक्रमादरम्यान दिली.

कुणीतरी आपली खोड काढत असेल तर महिलांनी न घाबरता तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी यामुळे समाजातील विकृतीला वेळीच पायबंद घालून योग्य कारवाई करता येईल, असेही ते पुढे म्हणाले.

परकीय गुंतवणुकदारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड व पुण्यासह इतर शहरात गोर गरिबांना परवडेल अशा गृहनिर्माण केले जाणार आहे तसेच शहरात भेडसावत असणाऱ्या पार्किंगच्या समस्यांवर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या समस्यांवर नवीन कल्पना शोधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही यावेळी त्यांनी सूचवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.