Pimpri : गुणवंत कामगार अनिल पालकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र शासनाकडून तीन वेळा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल हनुमंत पालकर (वय-60) यांचे शुक्रवारी (दि.10) हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, अक मुलगी असा परिवार आहे.

टाटा मोटर्स कपंनीतील एक गुणवंत कामगार म्हणून त्यांची ख्याती होती. राज्य सरकारच्या वतीने 1992, 1994, 2013 असा सलग तीन वेळा गुणवंत कामगार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. पोलीस नागरिक मित्र मंडळ, सन्मित्र फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, पिंपरी चिंचवड आरोग्य मित्र फाऊंडेशन यासह विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांचे योगदान होते. शहरातील पर्यावरण चळवळीतही त्यांचा पुढाकार होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.