Pimpri: पिंपरीत वाढीव मतदानाचा टक्का, कोणाला देणार धक्का ?

मागच्यापेक्षा 4 टक्के वाढलेले मतदान विधानसभा गाठण्याची कोणाला देणास संधी ?

एमपीसी न्यूज – …यंदाही उमेदवारी मिळेल की नाही याची धाकधूक असणारे विद्यमान आमदार,…..कुंपणावर बसून उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतराच्या तयारीत असलेले मात्र उमेदवारी कापल्यानंतर बंडखोरी करण्याचा इशारा दिलेले माजी आमदार…….पक्षाने विद्यमान नगरसेविकेला दिलेली अधिकृत उमेदवारी कट करत….पुन्हा माजी आमदाराच्याच गळ्यात टाकलेली उमेदवारी….अशा नाट्यमय घडामोडीनंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघात अनपेक्षितरित्या वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात विजय टाकणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एक लाख 67 हजार 600 महिला तर एक लाख 85 हजार 939 पुरुष आणि सहा अन्य असे तीन लाख 53 हजार 545 मतदार आहेत. यापैकी 97 हजार 328 पुरुष (52.34 टक्के) तर 80 हजार 280 महिला (47.69 टक्के) आणि इतर तीन अशा एक लाख 77 हजार 711 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. एकूण 50.27 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. 399 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. पावणे दोन लाख मतदारांनी शिवसेनेचे विद्यमान गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह 18 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद केले आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरीत 46.23 टक्के मतदान झाले होते. तर, यावेळी 50.27 टक्के मतदान झाले आहे. मागील वेळीपेक्षा यावेळी चार टक्के जास्त मतदान झाले आहे. वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात पडणार आणि कोणाला धक्का देणार यावरच पिंपरीच्या विजयाचे गणित अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी मतदार संघातील मतदानाचा टक्‍का

वर्ष –            टक्केवारी

2009 –      42.52 टक्के
2014 –       46.23 टक्के
2019 –       50.27 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.