Pimpri: शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी अण्णा बनसोडे यांना विजयी करा – वैशाली काळभोर

काळभोरनगर भागात बनसोडे यांची पदयात्रा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ काळभोरनगर आकुर्डी भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी काळभोर बोलत होत्या. या पदयात्रेत आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे, स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, तसेच मुकुंद काळभोर, जक्कल काळभोर, आझम खान, मनीषा काळभोर, चिंटू दातीर-पाटील, सविता धुमाळ, किरण देशमुख, दीपाली देशमुख आदी सहभागी झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी वैशाली  काळभोर म्हणाल्या की, अण्णा बनसोडे यांनी आमदार असताना सातत्याने लोकांची कामे केली. पिंपरी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काळभोर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.