Pimpri: शहराच्या विकासासाठी अण्णा बनसोडे यांना विजयी करा -आझम पानसरे

पानसरे यांच्या प्राधिकरण येथील निवासस्थानी मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती

एमपीसी न्यूज – शहराच्या विकासासाठी पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन ज्येष्ठनेते, माजी महापौर आझम पानसरे यांनी केले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी पानसरे यांच्या प्राधिकरण येथील निवासस्थानी मुस्लिम बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पानसरे बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी उपमहापौर महंमद पानसरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, जगदीश शेट्टी, नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक राजाराम कापसे, प्रशांत कापसे, प्रवक्ते फजल शेख, मुस्लिम उलेमा कौन्सिलचे सदर मौलाना फैज अहमद, कार्याध्यक्ष मौलाना हाजी नसीबउल्लाह, मुफ्ती आबीद रजा, उलेमा कौन्सिलचे महासचिव मौलाना नय्यर नूरी तसेच हाजी गुलाम रसूल सय्यद, मोहम्मद अली सय्यद, मेहबूब शेख, लतीफ सय्यद, शफीक शहा, याकूब खान, एजात खान, निहाज शेख, युसुफ कुरेशी, राजू मुलानी, समीर खान मौलाना अजीबी आदी उपस्थित होते.

यावेळी पानसरे म्हणाले, अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत त्यांना केवळ सुमारे 2 हजार 235 मतांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, पराभव झाल्यानंतरही गेली पाच वर्ष ते सातत्याने समाजातील विविध घटकांच्या संपर्कात आहेत. मुस्लिम बांधवांनीच नव्हे तर, समाजातील विविध घटकांनी पिंपरी मतदारसंघातून बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पानसरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.