Pimpri: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर 

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 9 मे 2019 रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. आठही प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे आठही समित्यांवर भाजपचा अध्यक्ष विराजमान होऊ शकतो.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक  म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 2, 3 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 आणि 4 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उमेदवारी अर्जांचे वाटप केले जाणार आहे. तर, 4 मे रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. क्षेत्रीय अधिका-यांकडे अर्ज जमा करायचे आहेत.  9 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून महापालिका मुख्यालयातील मधुकर पवळे सभागृहात निवडणुकीला सुरुवात होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
_MPC_DIR_MPU_II
  • आठही प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व
  • ‘अ’ प्रभागात भाजपचे नऊ नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. ‘ब’  प्रभागात भाजपचे आठ, राष्ट्रवादीचे सहा आणि शिवसेना एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. ‘क’  प्रभागात भाजपचे 11, राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक आहेत. ‘ड’ प्रभागात भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. ‘फ’ प्रभागात भाजपचे आठ, राष्ट्रवादीचे सहा, मनसे एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. ‘ग’ प्रभागात भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना दोन आणि अपक्ष दोन नगरसेवक आहेत. ‘ह’ प्रभागात भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे सहा आणि अपक्ष एक नगरसेवक आहे.
आठही प्रभागांमध्ये भाजपचे बहुमत आहे. त्याचबरोबर अपक्ष नगरसेवकही भाजपसोबत आहेत. त्यामुळे आठही समित्यांवर भाजपचे अध्यक्ष निवडून येऊ शकतात. दरम्यान, स्थायी समितीसह विविध समित्यांमध्ये वर्णी न लागलेले नगरसेवक प्रभाग समितीचे अध्यक्षपद तरी मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.