Pimpri: महापौर कक्षातील आणखी एका कर्मचा-याला कोरोनाचा संसर्ग

Another employee in the mayor's office was infected with corona :पॉझिटिव्ह आलेली महिला कर्मचारी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांसंदर्भात कामे करतात.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या कक्षामध्ये काम करणा-या एका महिला कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट आज (शनिवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, यापूर्वीही महापौर कक्षातील एका लिपिकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी एक महिला कर्मचारी बाधित झाली आहे.

पालिका मुख्यालयातील तिस-या मजल्यावर महापौरांचे दालन आहे. कोरोनाच्या काळात अनेक कामे व तक्रारीसाठी महापौर कक्षात दिवसभर अनेकांची वर्दळ असते.

महापौर कक्षामध्ये हिशेबाचे काम पाहण्यासाठी एक महिला कर्मचारी आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी त्रास होत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेली महिला कर्मचारी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांसंदर्भात कामे करतात.

गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून फाईल आल्या. तसेच, त्या फाईलचा पाठपुरावा करण्यासाठी अनेकजण येतात. त्यामुळे संबंधित महिलेच्या संपर्कात कोणी आले होते का, याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वी महापौर कक्षातील एका लिपिकाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर कक्षातील सर्व कर्मचा-यांची चाचणी करण्यात आली होती. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले.  पण, आता महिला कर्मचा-याला लागण झाली आहे. त्यामुळे  इतर कर्मचा-यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.