Pimpri: शहरातील आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह; सक्रिय रुग्णांची संख्या 44 तर, 18 रुग्ण कोरोनामुक्त

आजपर्यंत 64 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी शहरातील आज (मंगळवारी) आणखी एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभरात दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 44 वर पोहचली आहे. आजपर्यंत 64 जणांना कोरोनाची लागण झाली असून 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी शहरातील 55 वर्षीय महिलेचे नमुने तपसाणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आले असून या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, महिलेला कोणाच्या संपर्कातून लागण झाली? याची माहिती समजू शकली नाही.

दरम्यान, पुण्यातील एका भागातील राहणा-या आणि पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या एका 27 वर्षीय तरुणाचे सकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आता या महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आज दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 64 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाबाधित सक्रिय 44 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 39 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, सात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर पुण्यातील आणि एका रुग्णावर परभणी येथील रुग्णालयात अशा आठ जणांवर शहराबाहेर उपचार सुरु आहेत.

रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा आणि सोमवारी (दि.20) निगडी भागातील रहिवाशी पण, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • आजचा वैद्यकीय अहवाल!
    #दाखल झालेले संशयित रुग्ण – 72
    # पॉझिटीव्ह रुग्ण – 02
    #निगेटीव्ह रुग्ण – 44
    #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 72
    #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 109
    #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 44
    #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 64
    # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 44
    #वायसीएममध्ये 39 तर पुण्यात सात, परभणीत एका रुग्णावर उपचार सुरु
    # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 2
    #आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 18
    # दैनंदिन भेट दिलेली घरे – 15065
    #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 46066

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.