Pimpri: पिंपरीत कोरोनाचा आणखी एक ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण, बाधितांची संख्या 11 वर

फिलिपिन्स येथून आला शहरात, बालेवाडी स्टेडीयम येथे 500 बेडचा क्वारंटाईन वार्ड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (बुधवारी) कोरोनाचा आणखी एक रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळला आहे. हा रुग्ण फिलिपिन्स येथून प्रवास करुन शहरात आलेला आहे. शहरात दररोज एक ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पिंपरी शहरात एकूण कोरोना बाधित 11 रुग्ण झाले असून, पुण्यात आठ असे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 19 वर पोहचला आहे. बालेवाडी स्टेडीयम श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 500 बेडचा क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज (बुधवारी) पर्यंत एकूण 92 व्यक्तींचे कोरोना करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एका व्यक्तीचा अहवाल आज ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. उर्वरीत चार व्यक्तींचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामधील कोरोना बाधितांची संख्या 11 झाली आहे. तर कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर महापालिका रुग्णालयांमधील ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच अहवाल ‘निगेटिव्ह’ आलेल्यांना घरी सोडण्यात आले असून, त्यांना घरात ‘क्वॉरनटाईन’ करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला आजचा रुग्ण हा फिलिपिन्स येथून प्रवास करुन पुणे शहरात आला आहे. त्याच्या सहवासात आलेल्या नागरिकांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. आज 12 जणांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासासाठी पाठविण्यात आले आहेत.

करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस घरांमध्येच होम ‘क्वॉरनटाईन’ करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकेच्या उपाय योजना !

या हेल्पलाईन क्रमांक 8888006666 चा वापर करा.
सर्वेक्षणाकरीता 244 कर्मचाऱ्यांची क्षेत्रीय सर्वेक्षण दल म्हणून नियुक्ती.
गहनिर्माण सोसायटी यांना उपाययोजना व घरातील विलगीकरन करण्याबाबत आवाहन.
परदेशी नागरिकांची त्वरीत माहिती देण्याचे आवाहन.
परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांना किमान 14 दिवस घरातील विलगीकरण कक्षामध्ये राहण्याचे आवाहन
खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तसेच आयएमए, पीडीडीए निमा या वैद्यकीय संघटनाचे संयुक्त पथक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.