Pimpri: रेल्वे प्रशासनाची अतिक्रमणावर धडक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी निराधारनगर येथील रेल्वे लगतच्या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाने आज (शनिवारी) धडक कारवाई केली. दरम्यान कारवाई सुरू असताना जमावाकडून घरांना आग लावून देण्यात आली. तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पिंपरीतील निराधारनगर येथे रेल्वे लाईनच्या लगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या थाटल्या आहेत. या 200 अनधिकृत झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाने आज दुपारी दोन वाजता रेल्वे पोलीस दलाच्या बंदोबस्तात धडक कारवाईला सुरुवात केली. या परिसरात सकाळी आठ वाजल्यापासूनच अतिक्रमण हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली होती. रहिवाशी एकत्रित येऊन कारवाईला विरोध करु लागले. त्यामुळे रेल्वे पोलीस दल तैनात करण्यात आले.

दोन जेसीबीच्या साह्याने कारवाई सुरू झाली. जमावाने घरांना आग लावली. तसेच पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.