Pimpri : वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सजली; खरेदीसाठी आधुनिक सावित्रींची लगबग

एमपीसी न्यूज – वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ विविध साहित्याने सजली आहे. पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रींची लगबग पाहायला मिळत आहे.

आधुनिक पेहराव परिधान केलेल्या नोकरदार महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी साहित्य खरेदीकरिता गर्दी केली होती. आपली परंपरा न सोडता महिलांनी वटपौर्णिमेसाठी आंबे, वाण, सूत आदींची खरेदी केली. रविवारी (दि. 16) वटपोर्णिमा साजरी होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला वटपौर्णिमेचे साहित्य विक्री होत आहे.

  • गावठी छोटे आंबे बाजारात दाखल झाल्याने ते 30-40 रुपये किलोने विक्री होत होते. पूजेसाठी लागणारे वाण 10 रुपयांपासून होते. पूजेचे ताट खास लेस लावलेल्या तबकासह विक्रीस होते, अशी माहिती चिंचवडमधील विक्रेत्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.