Pimpri : सख्ख्या भावांच्या मृत्यूस जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची ‘अपना वतन’ची मागणी

'अपना वतन' संघटनेचा मोर्चा

एमपीसी न्यूज- थेरगाव येथील पडवळनगर येथे अदनान हमीद मणियार ( वय 9 महिने ) व उजेर हमीद मणियार ( वय 4 वर्षे ) या दोन सख्या भावांचा डेंग्यू मुळे मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ ‘अपना वतन’ संघटनेच्या वतीने ग प्रभाग कार्यालयावर शनिवारी (दि. 21) मोर्चा काढण्यात आला. या मुलांच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

यापूर्वी संघटनेच्यावतीने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या साहायक आयुक्त स्मिता झगडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ के अनिल रॉय, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने याना निवेदन देण्यात आले होते. मात्र सदर निवेदनाची दखल प्रशासनाने न घेतल्याने धम्मदीप बुद्धविहार ते ग प्रभाग कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये संघटनेचे सचिव दिलीप गायकवाड ,संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर ,शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर , फारुख शेख ,आवद चाऊस ,अशा उजागर, हमीद शेख , हाजीमलंग शेख ,तौफिक पठाण ,चाऊस शेख ,फातिमा अन्सारी ,विशाल बारणे ,नयूम तुंगेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी पालिका प्रशासनच्या कारभारावर जोरदार टीका केली व अदनान व उजेर या दोन मुलांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. प्रशासन अधिकारी रमेश वस्ते यांनी संघटनेच्या सर्व मागण्यांवर 7 दिवसांमध्ये कारवाई करण्याचे लेखी पत्र संघटनेला दिले असल्याचे अपना वतन संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख मजहर शेख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.