_MPC_DIR_MPU_III

Pimpri : ‘इंद्रायणी थडी’साठी भोसरीतील महिला, बचत गटांना अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – भोसरीत मतदारसंघातील रहिवासी असलेल्या महिला,  महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव घेण्यात येणार आहे. जत्रेतील स्टॉलसाठी महिला, बचत गटांना अर्ज वाटप सुरु केले असून भोसरी मतदारसंघातील महिलांना 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव गतवर्षीपासून सुरु केला आहे. भोसरीतील गावजत्रा मैदानावर हा महोत्सव घेतला जातो. यंदा देखील जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचे सुनियोजित व्यवस्थापन करण्यासाठी यंदा लवकरच अर्ज मागविले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV
  • जत्रेच्या माध्यमातून भोसरी मतदारसंघातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. तसेच यातून बचत गटांच्या उत्पादनांची माहिती शहरातील नागरिकांना होते. बचतगटातील महिलांना व्यवसाय, विक्री कौशल्ये, बाजार, व्यवहार या गोष्टी जवळून अनुभवता येतात. त्याच उद्देशातून ही जत्रा भरविण्यात येते. इंद्रायणी थडी जत्रेमध्ये महिला बचत गटांना वस्तू विक्रीकरिता मोफत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येतात.

_MPC_DIR_MPU_II

इंद्रायणी थडी जत्रेतील स्टॉलसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत 750 अर्ज प्राप्त झाले आहेत. महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता 20 जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जाची सप्टेंबर महिन्यात छाननी केली जाणार आहे. छाननी करुन महिलांना लकी ‘ड्रा’ पद्धतीने स्टॉलचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील महिलांनी 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन आमदार महेशदादा लांडगे मित्र मंडळाने केले आहे.

  • आमदार महेश लांडगे यांचे जनसंपर्क कार्यालय. शितलबाग, भोसरी येथे अर्ज करायचे आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी संदीप ठाणेकर यांच्याशी 7720043860  या  नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.