Pimpri : गणेश मूर्तींचे विसर्जन हौदात करावे- ज्योतिका मलकानी

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाचे मांगल्य व पावित्र्य अबाधित ठेवून पर्यावरणाचे रक्षण करीत पिंपरीगावात विशालनगर येथे उभारण्यात आलेल्या गणेशमूर्ती विसर्जन हौदात नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन ज्योतिका मलकानी यांनी केले.

पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने सलग दुस-या वर्षी खासगी जागेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण तीन हौद उभारण्यात आले आहेत. याचे उद्‌घाटन शुक्रवारी (दि. 6) ज्योतिका मलकानी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सचिन चिंचवडे, आण्णा बनसोडे, विलास लांडे, मंगला कदम, संजोग वाघेरे-पाटील, योगेश बहल, विजय आसवानी, नाना काटे, कैलास कदम,राजू मिसाळ, शीतल शिंदे, मोरेश्वर भोंडवे,संदीप वाघेरे, विक्रांत लांडे, निकिता कदम, शैलेश मोरे,हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, धनराज आसवानी, हरेश आसवानी, राजेश पिल्ले, उल्हास शेट्टी, शेखर ओव्हाळ, उद्योजक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, सतीश आसवानी, अनिल आसवानी, रिना शेवलानी आदी उपस्थित होते

शुक्रवारी (दि. 6) या ठिकाणी एकूण 1279 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सण, उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे व गणेशोत्सव काळात नदी नाल्यांचे प्रदूषण होऊ नये. यासाठी यावर्षी देखील पिंपरीगावात हौद उभारण्यात आले आहेत. येथे गणेश मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन संयोजक विजय आसवानी यांनी केले आहे.

विजय आसवाणी यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, मूर्तीबरोबर असणारे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक व पिंपरी चिंचवड रोट्रॅक्ट क्लबचे ज्येष्ठ नागरिक भाविकांचे प्रबोधन करीत आहेत. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड दिले आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन करतात. मागील वर्षी या ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यावेळी जमा झालेल्या मूर्तींचे विघटन करण्यात आले. त्यातून जमा झालेल्या मातीतून आकर्षक कुंड्या बनवण्यात आल्या आहेत. त्या कुंड्यांचे मोफत वाटप मान्यवरांच्या हस्ते भाविकांना व गणेश मंडळांच्या संयोजकांना करण्यात आले, अशी माहिती उद्योजक श्रीचंद आसवानी यांनी दिली. स्वागत श्रीचंद आसवानी, तर आभार विजय आसवानी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.