Pimpri : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – प्रतिवर्षाप्रमाणे सलग तिस-या वर्षी रयत प्रतिष्ठानच्या माध्यमांतून समाजाच्या विकासासाठी अनेक व्यक्ती दिवसरात्र परिश्रम घेत असतात. अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्या-या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

छत्रपती शाहू महाराज व्यक्तींना राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने, तसेच रयतरत्न पुरस्काराने दि. 26 जूनला छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती रयत चे प्रा. सीताराम जाधव, शोभा निसळ यांनी दिली आहे.

  • तरी इच्छुकांनी आपली माहिती, दोन पासपोर्ट फोटोसह अर्जुन नारायण जाधव (गुरुजी), मु. पो. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड या पत्त्यावर दि. 18 जून 2019पर्यंत पाठवावी, असे आवाहन संयोजक समितीने केले आहे

यादिवशी मोफत आरोग्य शिबिर, शाहिरी, व्याख्यान आदींचे आयोजन केले आहे. पारंपारिक लोककलांचे जतन करण्यासाठी वाघ्या – मुरळी, बहुरुपी, आराधी. शाहिरी, कलगीतुरा, लावणी आदींचे सादरीकरण होणार असून लोककलावंतांनी संपर्क (मोबाईल क्रमांक 7744011011) साधावा, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.