Pimpri: दुकाने चालू करण्यासाठीच्या परवानगीचा अर्ज महापालिका संकेतस्थळावर उपलब्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने काही दुकाने चालू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर आजपासून अर्जाचा नमुना उपलब्ध झाला असून ऑनलाईन अर्ज भरुन व्यावसायिकांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मेलवर पाठवयाचा आहे. अर्ज केल्यानंतर महापालिकेची टीम प्रत्यक्षस्थळाची पाहणी करणार आहे. त्यानंतर दुकाने सुरु करण्यास प्रत्यक्षात परवानगी मिळणार आहे.

फॉर्म डाऊडलोड करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा….

प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामधील नागरी वसाहतीमधील अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तची एकल दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. एका गल्लीतील पाच दुकानेच सुरु करण्यास परवानगी असणार आहे. मिठाईचे, बेकरीचे, हार्डवेअरचे, इलेक्ट्रीकचे, चष्म्याचे, लहान मुलांचे कपड्याचे, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईलची दुकाने व गॅरेज चालू करण्यासाठी परवानगी देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना आजपासून उपलब्ध केला आहे. संबंधित व्यवसायिकांना ऑनलाईन अर्ज भरावा  लागणार आहे. अर्ज भरताना मालमत्ताकर भरल्याची पावती आणि आधारकार्ड सोबत जोडावे लागणार आहे. तसेच दुकानातील काम करणा-या कर्मचा-यांचीही माहिती भरणे बंधनकारक आहे.  त्यानंतर अर्ज आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मेलवर पाठवयाचा आहे. त्यासाठी महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांचे अनुक्रमे

  1. [email protected]
  2. [email protected]
  3. [email protected]
  4. [email protected]
  5. [email protected]
  6. [email protected]
  7. [email protected]
  8. [email protected]

हे ईमेल आयडी दिले आहेत.

क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयातील  टीम प्रत्यक्षस्थळाची पाहणी करणार आहे. त्यानंतर दुकान सुरु करण्यास परवानगी मिळणार आहे. याशिवाय दुकाने सुरु करताना काय करावे व काय करु नये, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना www.pcmcindia.gov.in या अर्जासोबत उपलब्ध आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.