Pimpri : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शहराध्यक्षपदासाठी मागविले अर्ज

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षाच्या रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जासाठी 7 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. 
शहराचे पक्ष निरिक्षक एम. डी. शेवाळे यांनी मे महिन्यात बैठक घेत पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर समन्वय समितीच्या माध्यमातून काम पाहिले जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आरपीआयची शहरात ब-यापैकी ताकद असून त्यांची भाजपसोबत युती आहे. युतीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ आरपीआयकडे आहे.
त्यापार्श्‍वभूमीवर पक्षाने शहराध्यक्ष निवडीची प्रक्रीया सुरु केली आहे. अध्यक्षपदासाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तपासणार आहेत. तेच शहराध्यक्ष निवडतील, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.