Pimpri : पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी पाच फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. या जत्रेतील स्टॉलसाठी महिला बचतगटांचे अर्ज स्वीकारण्यास पाच फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील महिला बचत गट प्रमुखांनी पाच फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नागरवस्ती विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.

यावर्षी पवनाथडी जत्रा 18 ते 21 फेब्रुवारी 2020 या कालावधीत सांगवीतील पी.डब्लू.डी. मैदानावर भरविण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. बचतगटांच्या उत्पादनांची सर्वांना माहिती व्हावी. बचतगटातील महिलांना विक्री कौशल्ये ज्ञात व्हावे. यासाठी वस्तू विक्रीकरिता पवनाथडी जत्रेत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

महिला बचतगटांचे स्टॉलसाठीचे अर्ज 9 ते 24 जानेवारी या कालावधीत मागविली होते. परंतु, पदाधिका-यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानुसार अर्ज करण्यास पाच फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यातील अर्ज क्षेत्रीय कार्यालय, नागरवस्ती विकास योजना विभागात स्वीकारण्यात येणार आहेत. संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकृतीही करण्यात येईल. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. स्टॉलाठी फक्त महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनीच अर्ज करावेत, असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.