Pimpri: पालिकेच्या YCM रुग्णालयात सक्षम अधिकारी नेमा- संदीप वाघेरे

Appoint a competent officer in the YCM hospital - Sandip Waghere

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील चालू असलेला भोंगळ कारभार थांबविण्यात यावा. पालिकेच्या कोविड समर्पित यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची जबाबदारी सक्षम वैद्यकीय अधिकार्‍याकडे देण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.

वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना कोविडच्या उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय येथे पालिकेमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार बाधित रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु, दोन दिवसांपूर्वी वायसीएममधील ऑक्सीजनचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे एकाच दिवशी 9 कोरोना रुग्ण दगावले. जुन्या पाईपलाईनवर ऑक्सीजन पुरवठा असल्याने तो ‘फ्लो’ कमी झाला होता.

सध्या पदव्युत्तर पदवीसाठी घेतलेले मानधनावरील अधिष्ठता डॉ.राजेंद्र वाबळे यांच्याकडे वायसीएम रुग्णालयाची जबाबदारी आहे. परंतु, त्यांना अशा उपचाराचा कुठलाही अनुभव नाही. त्यांचे आणि अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांचे वायसीएम रुग्णालयातील कामात पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असे नगरसेवक वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.