Pimpri : समाजवादी पक्षाच्या शहराध्यक्षपदी बी.डी.यादव यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड समाजवादी पक्षाच्या शहराध्यक्षपदी बी.डी.यादव यांची नियुक्ती करण्यात ( Pimpri ) आली आहे.  समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनी पुणे जिल्हा प्रभारी अनीस अहमद यांच्याशी सल्लामसलत करून ही नियुक्ती केली.

याशिवाय पिंपरी चिंचवड समाजवादी पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदी हसमुद्दीन अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्सारी हे व्यापारी आहेत. यावेळी चिंचवड विधानसभा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष रवी यादव, हसमुद्दीन अन्सारी, गणौर साहनी, महादेव वाजे आदी उपस्थित होते. पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटन मजबूत करू आणि पक्षाच्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करू व राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे विचार पुढे नेऊ अशी ग्वाही शहराध्यक्ष बी.डी.यादव यांनी यावेळी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना दिली.

Loksabha Election 2024 : निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी अव्याहतपणे काम करा; निवडणूक आयोगाचे पोलिसांना निर्देश

समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष बी.डी.यादव यांनी मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष असल्याचे म्हटले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार  खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे.

इंडिया आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी समाजवादी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस काम करेल. मी घरोघरी जाऊन उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजातील मतदारांना भेटून संजोग वाघेरे पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करणार आहे. तसे आदेश आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सुमारे 3 लाख उत्तर भारतीय मतदार निर्णायक भूमिका ( Pimpri ) बजावतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.