Pimpri: राज्य सरकारच्या समितीवरील गौतम चाबुकस्वार, अमित गोरखे यांची नियुक्ती रद्द

Pimpri: Appointment of Gautam Chabukaswar and Amit Gorkhe on state government committee canceled राज्यातील सत्तांतराचा सर्वाधिक फटका पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नेत्यांना बसला आहे.

एमपीसी न्यूज- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गतच्या विविध समित्यांवरील अशासकीय अध्यक्ष, सदस्यांच्या नियुक्त्या राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. त्यात व्यसनमुक्ती नियामक मंडळवरील सदस्य असलेले पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि क्रांतीगुरु लहूजी साळवे स्मारक समितीचे सदस्य अमित गोरखे यांची नियुक्ती रद्द झाली आहे.

राज्यातील सत्तांतराचा सर्वाधिक फटका पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नेत्यांना बसला आहे. भाजपचे सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, अमित गोरखे यांचा राज्यमंत्रिपदाचा दर्जा गेला. अमर साबळे यांना राज्यसभेवर दुस-यांदा संधी मिळाली नाही. आता सर्व आयोग, समित्यांवरील सदस्यपद देखील रद्द झाले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध समित्या कार्यरत आहेत. या समित्यांवरील तत्कालीन सरकारने नियुक्त केलेले अशासकीय अध्यक्ष, सदस्य यांच्या नियुक्त रद्द करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. त्यानुसार सरकारने सर्व अशासकीय अध्यक्ष, सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

त्यात पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती नियामक मंडळाचे सदस्य होते. त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. तर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे क्रांतीगुरु लहूजी साळवे स्मारक समितीचे सदस्य होते.

तसेच अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासंदर्भात गठीत केलेल्या समितीचे देखील ते सदस्य होते. त्यांचे दोनही समितीवरील सदस्यत्व रद्द झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.