Pimpri: विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती; ‘पिंपरी, भोसरी’ मतदारसंघासाठी आयआरएस अधिकारी अमरसिंह नेहरा

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी राजस्थानचे आयआरएस अधिकारी अमरसिंह नेहरा यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

विधानसभा निवडणुकीकरिता निरीक्षकांची नियुक्ती केली जाते. पिंपरी आणि भोसरी या दोन्ही मतदारसंघाचे खर्च निरीक्षक म्हणून अमरसिंह नेहरा यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पिंपरी आणि भोसरी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाला भेट दिली. एक खिडकी, आचारसंहिता कक्ष, फ्लाईस स्कॉड, एसएसटी, व्हीव्हीटी, ईव्हीएम व्यवस्थापनाची माहिती घेतली.

निवडणूक आचारसंहिता कालावधीत कुठे अवैधरित्या मद्य , वस्तू, पैसे वाटप होत असल्याचे आढळल्यास 9404541239 नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, [email protected] या ई-मेलवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.