Pimpri : शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे भाजपमध्ये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे यांनी आज (गुरुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोघांनी भोसरीतील कार्यक्रमात भाजपचे कमळ हाती घेतले.

अर्जुन ठाकरे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सभापतीपदाची संधी दिली होती. त्यांच्या पत्नी मंदाकिनी ठाकरे या 2012 ते 2017 दरम्यान नगरसेविका होत्या. मासुळकर कॉलनीतून राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्या निवडून आल्या होत्या. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे मंदाकिनी ठाकरे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता.

आज अर्जुन ठाकरे आणि मंदाकिनी ठाकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.