Pimpri: इंग्लडमधील क्रिकेट स्पर्धेचा अर्णव दत्ता ठरला मानकरी

एमपीसी न्यूज – इंग्लड येथे झालेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पिंपरीतील अर्णव दत्ता याने 9 सामन्यांमध्ये 20 गडी बाद करीत उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे त्याला स्पर्धेचा मानकरी किताब बहाल करण्यात आला.

पुण्यातील लिजण्ड क्रिकेट क्‍लबच्या वतीने या इंग्लड दौर्‍याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. माजी रणजी क्रिकेटपटू मानसिंग निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौरा झाला. इंग्लड येथील स्थानिक क्रिकेट क्‍लबच्या 19 संघांचा सहभाग होता. संघाने एकूण 9 सामने खेळले.

संघाचा कर्णधार असलेल्या दत्ता याने नेत्रदीपक कामगिरी करीत 9 सामन्यांमध्ये 30 षटक गोलंदाजी करताना सर्वांधिक एकूण 20 गडी बाद केले. त्यातील एका सामन्यात सर्वांधिक 5 गडी बाद करीत संघाचा विजयात महत्वाचा वाटा उचलला. तसेच 1 हॅट्ट्रिकही नोंदविली. फलंदाजी करताना 30 व नाबाद 40 असा धावाही केल्या. त्याने 5 सामन्यात सामनाचा मानकरी किताब जिंकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.