Pimpri : प्रवासी नागरिकाची पैशांची पिशवी हिसकावणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणा-या प्रवासी नागरिकांची बसमधून उतरल्यानंतर पैशांची पिशवी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 10) दुपारी पावणेपाच वाजता वल्लभनगर पीएमपीएमएल बस स्टॉप येथे घडली. पैशांची पिशवी चोरून नेणा-या दोन्ही चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष तिपण्णा गायकवाड (वय 34) आणि विशाल अंबादास जाधव (वय 25, दोघे रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष मोतीराम चव्हाण (वय 49, रा. मोशी, ता. हवेली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पावणे पाच वाजता फिर्यादी चव्हाण पीएमपीएमएल बसमधून वल्लभनगर बस स्थानकावर उतरले. तिथून ते पायी चालत जात असताना त्यांच्या हातातील कापडी पिशवी दोन चोरट्यांनी पळवली. पिशवीमध्ये 18 हजार रुपये रोख रक्कम होती. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना तात्काळ अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.