Pimpri : अरविंद एज्युकेशन सोसायटीत गांधी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

एमपीसी न्यूज- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल आणि भारतीय विद्या निकेतन विद्यालयात गांधी जयंती मेमरी गेम, स्वच्छता अभियान, स्वच्छतेवर आधारित चित्रकला, नाटक, गाणी आदी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, तेजल कोळसे पाटील, मुख्याध्यापिका हर्षा बांठिया, गीता येरूणकर, यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

पहिलीतील विद्यार्थी संकर्षण वरेकर याने गांधीजींचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील भूमिकेविषयी माहिती दिली. शिक्षिका अंजुम पिरजादे, तसेच विद्यार्थिनी श्रावणी कदम, पिंकी चौधरी यांनी गांधीजींच्या कार्याविषयी आपल्या भाषणातून माहिती दिली. पाचवीतील आर्यन गायकवाड याने गांधीजींची वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांनी विविध नाटक आणि गांधीजींवरील गाणी सादर केली, तसेच गांधीजींच्या तीन माकडांच्या आधारे चांगली वर्तणूक कशी असावी हा संदेश दिला.

हर्षा बांठिया यांनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. गीता येरूणकर यांनी ‘रघुपती राघव राजाराम’ भजन गात सत्य, अहिंसा आणि सर्वोदय हे महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे सार स्पष्ट केले. शिक्षिका स्वाती तोडकर यांनी गांधीजींविषयी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून गांधीजींची तीन माकडे ‘बुरा मत देखो’, ‘बुरा मत सूनो’, ‘बुरा मत बोलो’ याचा अर्थ स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनीही आपल्या जीवनात या तीन गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन नीलम पवार यांनी, प्रास्ताविक शिक्षिका सुमित्रा कुंभार व सोनाली आवळे यांनी, सूत्रसंचालन विद्यार्थिनी नम्रता राऊत आणि रितिका चौधरी यांनी, तर आभार कविता मुदलियार आणि आर्या भोर पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.