Pimpri : …म्हणून माजी कर्मचाऱ्यांनी संचालकाचे केले अपहरण

चऱ्होली अपहरणप्रकरणी दोन आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करत असताना चोरी होत असल्याचे दोघांच्या लक्षात आले…त्यांनी हा प्रकार मालकाच्या नजरेत आणून देण्याच्या प्रयत्न केला. मात्र, एका संचालकाने त्यांनाच चोरीच्या खोट्या आरोपात अडकवून कामावरून काढून टाकले. चांगल्या कामाचे वाईट फळ त्यांच्या जिव्हारी लागले आणि अपहरणाचा डाव आखला…त्या संचालकाचे अपहरण करून बेदम मारहाण करून सोडून दिले…मात्र, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्यांना गुरुवारी (दि.१८) शिवाजीनगर परिसरातून अटक केली आणि हा सर्व प्रकार समोर आला.

योगेश गणपती काकडे (वय २५) आणि किरण राजेंद्र सकटे (वय २२, दोघे रा.चऱ्होली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. डॉ. शिवाजी पडवळ (वय ५५,रा. धायरी) असे अपहरण झालेल्या संचालकाचे नाव आहे.

  • पडवळ हे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या मोटारीतून घरी जात होते. चऱ्होली येथे आले असता आरोपींनी त्यांची मोटार अडवली. आमच्या वाहनाला कट का मारला’ असे म्हणत अपहारणकर्त्यांनी डॉ. पडवळ यांच्या कारचालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्यांच्या मोटारीचा ताबा घेऊन पळ काढला. कारचालकाने माहिती दिली असता स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने समांतर तपास सुरु केला.

दरम्यान, पडवळ यांना केडगाव चौफुला येथील पंजाबी ढाब्याजवळ सोडल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी तात्काळ जाऊन मारहाणीत जखमी झालेल्या डॉ. पडवळ यांना ताब्यात घेतले.

  • दरम्यान, पडवळ यांनी पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी तापास केला आता त्यांच्या कंपनीतील माजी कामगारांनी गुन्हा केला असल्याचे समोर आले. त्यांना गुरुवारी शिवाजीनगर परिसरातून ताब्यात घेतले असता चोरीचा खोटा आळ घेऊन नोकरीवरून काढल्याच्या रागातून कृत्य केल्याचे सांगितले. वारसीथ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.