Pimpri : वाहन चोरीचे सत्र सुरूच, शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी एक रिक्षा चोरीला

वाहन चोरीच्या या घटना चाकण, भोसरी, थेरगाव, कासारवाडी या भागात घडल्या आहेत. : As the vehicle theft season continues, three two-wheelers and a rickshaw were stolen from different parts of the city

एमपीसी न्यूज – शहरातील वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी एक रिक्षा चोरीला गेल्या आहेत. वाहन चोरीच्या या घटना चाकण, भोसरी, थेरगाव, कासारवाडी या भागात घडल्या आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीला गेलेली वाहने घराजवळ पार्क केली होती. तरीही चोरटयांनी हि वाहने करून नेली.

दुचाकी चोरीची पहिली घटना गुरुवारी (दि.30) रोजी चाकण गावाजवळ आंबेठाण चौक, ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी महेश बाळशिराम खलाटे (वय.30, रा. काळुस गणेशनगर, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश यांची पंधरा हजार किंमतीची (एमएच 14 / एफडब्यू 6683) दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

दुचाकी चोरीची दुसरी घटना 24 जुलै रोजी भोसरी येथे घडली.

याप्रकरणी वैभव नामदेव डेरले (वय.26, सध्या रा. गंगोत्री पार्क,दिघी रोड, भोसरी, मुळ रा. नाशिक) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 25,000 हजार किंमतीची (एमएच 15/ एफजी 1135) ही दुचाकी घराजवळ पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ती पळवून नेली आहे.

दुचाकी चोरीची तिसरी घटना 27 जुलै रोजी डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी जाबरमल बदुराम कुमावत (वय.34 रा. सदगुरू कॉलनी, भिंगारे कॉर्नर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाबरमल यांची पंचवीस हजार किंमतीची दुचाकी ( एमएच 14/ सीटी 4173) घरासमोर लाॅक करून पार्क केली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

चौथी चोरीची घटना ही रिक्षा चोरीची आहे. ही घटना 29 जुलै रोजी पिंपळे गुरव रोड, कासारवाडी, येथे घडली आहे.

याप्रकरणी मुजीप अब्दुल पटेल (वय.35, रा. विकासनगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुजीप यांची (एमएच 14 /सीयु 1053) ही 35 हजार किंमतीची ऑटो रिक्षा लाॅक करून पार्क केली होती. ही रिक्षा चोरट्याने चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.