BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अशोक खरात

उपाध्यक्षपदी अभिजित शेंडगे; माजी नगरसेवक राजू दुर्गे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ ची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे.

या जयंती सोहळ्यासाठी नगरसेविका आशा शेंडगे आणि माजी नगरसेवक राजू दुर्गे व समाजातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मान्यतेने ज्येष्ठ नागरिकांचा आणि युवा कार्यकर्त्यांचा समन्वय साधून २०१९ ची कार्यकारीणी जाहिर करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

  • यासाठी अध्यक्ष अशोक खरात, उपाध्यक्ष अभिजित शेंडगे, कार्याध्यक्ष महावीर काळे, खजिनदार दत्ता मोसलगी, सरचिटणीस सुनील बनसोडे, चिटणीस गणेश पाडोळे, कार्यकारिणी सदस्य यशोदा नायकवडी, पै. काळूराम कवितके, पै. विठ्ठल सरेकर, संतोष पांढरे, राहुल मदने, मार्गदर्शक दादासाहेब देवकाते, नामदेव सोनवलकर, अभिमन्यू गाडेकर, नागेश तितर, लक्ष्मण रूपनर, सुर्यकांत गोफणे, बजरंग गडदे, बाळासाहेब वाघमोडे, महादेव कवितके, माणिकराव बारगळ, मधुकर लंबाते, भारत नाना कोकरे, शिवाजी बिटके यांची निवड करण्यात आली आहे.
HB_POST_END_FTR-A2