Pimpri: अष्टीकरांकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे रजेवर गेल्याने, त्यांच्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर आणि विजय खोराटे यांच्या सोपविण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे 17 ते 21 डिसेंबरदरम्यान रजेवर आहेत. या काळात प्रशासकीय कामात अडचण येऊ नये यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चितळे यांच्याकडे असलेल्या विविध विभागांचा पदभार अन्य दोन सहाय्यक आयुक्‍तांकडे सोपविला आहे.

चितळे यांच्याकडे महत्त्वाच्या प्रशासन आणि भूमी व जिंदगी या दोन विभागांचा कार्यभार आहे. त्यांच्या रजेदरम्यान प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरुपात हा बदल करण्यात आला आहे. भांडार विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे प्रशासन विभागाचा तर आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे भूमी व जिंदगी विभागाचा पदभार देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.