BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : आशियाई रोईंग स्पर्धेमधे अविनाश बोधले याला सुवर्णपदक


एमपीसी न्यूज – थायलंड येथे 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान झालेल्या आशियाई रोईंग स्पर्धेमधे कॉक्सड कैटर पुल या इवेंटमध्ये अविनाश नामदेव बोधले या खेळाडूने सुवर्ण पदक पटकवले.

या स्पर्धेमधे थाईलैंड, फिलीपींस, कुवैत, जपान, ब्रामिया,कज़ाकिस्तान, अफगानिस्तान, बांग्लादेश या देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. या सर्व देशांच्या खेळाडूंवर मात करत अविनाश बोधले याने भारताची मान उंचावली.

अविनाश मुळचा नातेपुते सोलापुर या गावचा आहे. सध्या लष्करामध्ये कार्यरत असून पिंपरीतील सीएमई येथे सराव करत आहे. याआधी देखील अविनाशने नॅशनल गेम्स मध्ये आणि नॅशनल रोईंग स्पर्धे मध्ये उत्त्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते. अविनाशचे प्रशिक्षक रघुवीर सिंग कुद्रत अली आणि विकाल सर्वे यांच्या मार्गदर्शनमुळेच मी सुवर्णपदक मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया अविनाश याने दिली.

स्पर्धेसाठी यश संपादन केल्याबद्दल अविनाशचे वडील नामदेव बोधले, आई आशा बोधले, बहीण पूजा बोधले तसेच आर्मी रोइंग नोडचे सीओ कर्नल संदीप चहल व राष्ट्रीय खेळाडू अक्षय बारगजे यांनी शुभेच्छा दिल्या.

HB_POST_END_FTR-A2

.