Pimpri : पिंपरीतील 92 केंद्रांमध्ये होणार बदल

एमपीसी न्यूज – मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास त्रास होऊ नये, यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील काही मतदारसंघामध्ये बदल करण्यात येणार आहेत. दिव्यांग व वृध्द मतदारांची सोय व्हावी, याकरिता 92 शाळेतील मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर ही मतदान केंद्र करण्यात येणार आहेत.

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही 399 बूथ असणार आहेत. मात्र, यावेळी मतदारसंघामधील जवळपास 92 मतदान केंद्राची जागा बदलण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघामधील 100 मतदान केंद्रेही दुसऱ्या तसेच तिसऱ्या मजल्यावर होती. त्यामुळे, अपंग तसेच वृध्द मतदारांना मतदानासाठी जाताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत यातील काही मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, काही मतदान केंद्रे जागेअभावी दुसऱ्या मजल्यावर होती.

त्यामुळे, अपंग तसेच वृध्द मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. ही बाब ओळखून येत्या विधानसभा निवडणुकीत या मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार, 92 मतदान केंद्रामधील जागा बदलण्यात येणार आहेत. त्यापैकी, काही शाळेतील मतदान केंद्र बदलून दुसऱ्या शाळेमध्ये नेण्यात येणार आहे. तर काही शाळेमधील मतदान केंद्र हे पहिल्या मजल्यावर घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.