Pimpri: मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनची कोरोनाच्या लढ्यासाठी महापालिकेला तीन लाखांची मदत

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढ्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला तीन लाखांची मदत केली आहे. कोरोना साह्य मदत निधीचा धनादेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आज (शुक्रवारी) सुपूर्द करण्यात आला.

बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र सावंत, उपाध्यक्ष नंदू घाटे, सचिव संदीप कोल्हटकर , खजिनदार प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकारणीच्या पुढाकाराने मदत निधी देण्यात आला आहे. मदत निधी देताना गर्दी नको म्हणून संघटनेच्या वतीने सदस्य मोहन कलाटे, राजू भिसे, शंकर जगताप आणि बाळासाहेब करंजुले या तिघांनीच महापालिकेत जाऊन आयुक्तांकडे धनादेश सुपूर्द केला.

”मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन कायमच सामाजिक बांधिलकी जपते. कोणतेही नैसर्गिक संकट आल्यानंतर संघटना मदतीचा हात पुढे करीत असते. असेच आज देशात नव्हे तर जगावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. या संकटाविरोधात लढण्यासाठी संघटनेच्या वतीने कोरोना साह्य मदत निधीला तीन लाखाचा धनादेश दिल्याचे”, बाळासाहेब करंजुले यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सहाय्यता आणि पुणे महापालिकेला अशी दहा लाख रुपयांचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.