pimpri : जिजाऊ स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रुपयांची मदत

Assistance of Rs. 51,000 to the Chief Minister's Assistance Fund on the occasion of Jijau Memorial Day

एमपीसीन्यूज : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या 346 व्या स्मृतीदिनानिमित्त मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली.

मराठा सेवा संघाच्या आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड- पुणे येथील कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मावळ विभागीय प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ॲड. लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, सचिव वाल्मिक माने, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नकुल भोईर, जिजाऊ ब्रिगेडच्या शहर कार्याध्यक्षा सुनिता शिंदे, डॉ. प्रकाश चव्हाण, पतसंस्थेचे व्यवस्थापक पोपट शिर्के व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.

जिजाऊ स्मृतीदिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पतसंस्थेचे सचिव व मराठा सेवा संघाचे केरळ राज्य प्रभारी प्रकाश जाधव यांच्या हस्ते ‘कोविड’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रुपयांचा धनादेश मावळ प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले. स्वागत ॲड. लक्ष्मण रानवडे केले व आभार पोपट शिर्के यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.