Pimpri : उद्योजक अनिल आसवानी आणि मित्रपरिवाराच्या शिबिरात 55 दात्यांनी केले रक्तदान

at the Entrepreneur Anil Aswani and Mitra Parivar camp 55 donors donated blood

एमपीसी न्यूज – राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक अनिल आसवानी आणि मित्रपरिवाराकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पिंपरी कॅम्प येथील संत कंवरराम बुड्डा मंडळी ट्रस्टच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यामध्ये पिंपरी कॅम्पमधील दिव्यांग सेल्समन दीपक शिघे यांनी देखील रक्तदान करून इतरांचा उत्साह वाढविला. शिघे यांनी दाखवलेले समाजभान पाहून आयोजक अनिल आसवानी यांनी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

संकलित झालेले रक्त पिंपरीतील ‘पिंपरी चिंचवड सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ या रक्तपेढीत जमा करण्यात आले.

या रक्तदान शिबिराच्या आयोजनात महेश नागरानी, प्रकाश समतानी, धनेश तलरेजा, जगदीश आसवानी, शशिकिरण यादव, अनिल तांबे, सुनील घोगिया, सुनील छुगानी, पवन रामनानी, दीपक पंजवानी, ईश्वर राजानी आदींनी सहभाग घेतला होता.

राज्यात सद्यस्थितीत अत्यल्प रक्तसाठा शिल्लक आहे. तो पुढील 5 ते 6 दिवसच पुरू शकेल त्यामुळे सरकारने मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.