Pimpri : अथर्व पिसे, प्राची खोत ‘शास्त्रीय’तर आदित्य पंडित, हृषीकेश पोफळे, प्राची पांडे आणि उमा कांबळे ‘सुगम संगीत’ विभागात प्रथम

कै . पं. शरद जोशी आणि संगीत भूषण कै.पं.राम मराठे स्मृती राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत, गायन, वादन व सुगम संगीत स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज – श्रीरंग कलानिकेतन, तळेगांव दाभाडे तर्फे आयोजित केलेल्या कै. पं.शरद जोशी आणि संगीतभूषण कै. पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धेच्या अंतिम फेरीचा समारोह हेरिटेज एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात सुप्रसिद्ध गायिका बकुळ पंडित यांचे हस्ते शुभारंभ होऊन दि.11 आणि 12 जाने २०२० रोजी पार पडला. त्यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी शिष्याने गुरुकडून विद्या घेताना चोखंदळपणे शिकावे असे सांगितले.

कै.पं. शरद जोशी आपल्यात नसले तरी त्यांचे आशिर्वाद कायमच आपल्या पाठीशी असणार आहेत असे सांगून संस्थेच्या अध्यक्षा डॉ.नेहा कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात कै.पं.शरदराव जोशी यांना आदरांजली वाहिली व मुक्त हस्ताने या उपक्रमासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांचे ऋण व्यक्त केले .

यावेळी हेरिटेज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मा.हरिश्चंद्र गडसिंग, साप्ताहिक अंबर संपादक व गायक मा.सुरेश साखवळकर, श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ.नेहा कुलकर्णी , कार्यवाह विनय कशेळकर,विश्वस्त सौ.बागेश्री लोणकर,विश्वास देशपांडे, उपाध्यक्ष व राजीव कुमठेकर आणि स्पर्धा प्रमुख दीपक बिचे उपस्थित होते.

हेरिटेज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मा.हरिश्चंद्र गडसिंग यांनी ही स्पर्धा हेरिटेज एज्युकेशन सोसायटीच्या जागेत आयोजित केल्या बद्दल श्रीरंग कलानिकेतनचे आभार मानले. सौ.कांचन सावंत यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले तर स्पर्धा प्रमुख प्रा.दीपक बीचे यांनी आभार प्रदर्शन केले

मागील वर्षीपासून प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून २१४ स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली होती. ही स्पर्धा शास्त्रीय कंठ गायन, सुगमसंगीत गायन, नाट्यगीत गायन तसेच तबला-पखवाज संवादिनी, वादन अशा विविध प्रकारात आणि निरनिराळ्या वयोगटात घेण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

पुणे,नांदेड,नगर,कोल्हापूर,पिंपरी चिंचवड,माजलगाव, रत्नागिरी, औरंगाबाद, बोरीवली,ठाणे,तळेगाव या ठिकाणाहून निवड झालेल्या कलाकारांचे गायन, वादन ऐकण्याची संधी तळेगावकर रसिकांना मिळाली.

 • स्पर्धेचा निकाल :
  शास्त्रीय कंठ संगीत लहान गट -प्रथम – अथर्व पिसे, द्वितीय – युगंधरा केचे, तृतीय- उर्वी प्रभुदेसाई.
  शास्त्रीय कंठ संगीत खुला गट -प्रथम – प्राची खोत , द्वितीय – आर्या आयगळीकर, तृतीय- ऋषी त्रिवेदी.
  नाट्य संगीत लहान गट (१० ते १७) -प्रथम – आदित्य पंडित, द्वितीय – युगंधरा केचे, तृतीय- सायली टाक,
  नाट्य संगीत मोठा गट (वय १७ ते ४०)-प्रथम–शीतल गद्रे, द्वितीय–श्रेया कुलकर्णी.
  सुगम संगीत लहान गट – प्रथम – आदित्य पंडित, द्वितीय – युगंधरा केचे, तृतीय- मैत्रीयी भोसले.
  सुगम संगीत युवा गट -प्रथम ह्रशिकेष पोफळे, द्वितीय – स्नेहल नाईक, तृतीय- श्रिया शिंदे
  सुगम संगीत प्रौढ गट (वय ३१ ते ५०) -प्रथम प्राची पांडे, द्वितीय – रुपाली विरूटकर, तृतीय- प्रिया कुलकर्णी
  सुगम संगीत जेष्ठ गट (वय ५१ च्या पुढे) -प्रथम – उमा कांबळे, द्वितीय – मेधा रानडे , तृतीय- वैशाली वैद्य
  संवादिनी वादन लहान गट प्रथम-नचिकेत हरिदास, द्वितीय –अन्वय कानिटकर,तृतीय- आदित्य उदार,
  संवादिनी वादन खुला गट प्रथम-पूर्वा खरे , द्वितीय –गिरीजा एरंडे.
  तबला वादन लहान गट प्रथम-अनिश थत्ते , द्वितीय–रुची जाधव , तृतीय-वेदांत सावंत,
  तबला वादन खुला गट प्रथम-ईशान मक्तेदार , द्वितीय–प्रणव चिकोडीकर, तृतीय-संकेत कुलकर्णी ,
  पखवाज वादन लहान गट प्रथम- दीपक चव्हाल , द्वितीय –नागेश अवचर,
  पखवाज वादन खुला गट प्रथम- देवदत्त घोगळे, द्वितीय –सागर गुरव ,तृतीय-दत्ता सोनावणे ,

सन्माननीय शेखर कुंभोजकर,डॉ.महावीर बागवडे,सोनाली सरदेशपांडे,अस्मिता फाटक,मुकुंद पंडित,ललिता जोशी,हेमंत आठवले, जयंत साने, प्रकाश बेहरे, धनंजय पंडीत व डॉ.सतीश वैद्य, प्रशांत फाटक, शैलेश वर्तक, प्राजक्ता ठकार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेसाठी केदार कुलकर्णी,निलेश शिंदे, विष्णु कुलकर्णी, कौस्तुभ ओक, विनय कशेळकर, आणि मंगेश राजहंस यांनी तबला साथ केली तर सौ.संपदा थिटे,जयंत साने, नचिकेत हरिदास, पूर्वा जोग, प्रदीप जोशी, हिमांशु जोशी आणि प्रमोद जोशी यांनी संवादिनी साथ केली .

कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनात विनय कशेळकर, दिपक आपटे,लक्ष्मीकांत घोंगडे,जयंत पटवर्धन,विलास रानडे,सीमा आवटी, सौ.कांचन सावंत, राजीव कुमठेकर, विश्वास देशपांडे, अनिरुद्ध जोशी,डॉ.राजेंद्र कुलकर्णी,प्रकाशराव जोशी, सुनील सोनार, रोनित गोठिवरेकर, अनिरुद्ध जोशी, सुहास धस, गोरख सावंत, किरण कुलकर्णी, दीपक बिचे, हृतिक पाटील, केदार अभ्यंकर, श्रीकांत चेपे यांचा महत्वाचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.