Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी अतिश बारणे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्ष पदावर युवा उद्योजक अतिश बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

अतिश बारणे युवा उद्योजक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेत पक्षाने ही जबाबदारी त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्याय धोरणे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याचे बारणे यांना दिलेल्या नियुक्ती पात्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.