Pimpri : पिंपरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सेफ्टी लॉक तोडून कॅमेरा फोडला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांचा एटीएम चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी एटीएममधील सेफ्टी डोअर आणि कॅमेरा फोडला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे दीडच्या सुमारास उद्यमनगर पिंपरी येथे एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरवर घडली.

दिनेश धोंडीराम शिर्के (वय 27, रा. शिवनगर, दिघी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील उद्यमनगर येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. रविवारी पहाटे दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सेंटरमध्ये प्रवेश केला. सेंटरचे सेफ्टी लॉक तोडले. कॅमेरा फोडून नुकसान केले. एटीएम चोरण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.